म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वसंतराव नाईक महाविद्यालयात शिकत असलेला कबड्डीपटू सुनील दुबिलेची प्रो-कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्रो-कबड्डी स्पर्धेच्या सातव्या हंगामात सुनील दुबिले हा बंगाल बॉरियर्स संघाकडून खेळणार आहे. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी बंगाल वॉरियर्स संघाच्या प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ झाला आहे. या शिबिरातही सुनील दाखल झाला आहे. क्रीडा शिक्षक युवराज राठोड यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.