अ‍ॅपशहर

कबड्डीची सर्व्हिस टाकण्यासाठी गेला तो परतलाच नाही, Live सामन्यातच झाला खेळाडूचा मृत्यू

कबड्डीचा सामना सुरु असताना विमलराजच्या संघाची चढाई करण्याची पाळी आली होती. त्यावेळी संघाकडून विमलराजला चढाई करण्यासाठी पाठवण्यात आले. तो चढाई करण्यासाठी शिरला. त्यावेळी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी त्याला घेरण्याचा प्रयत्न केला. विमलराजला घेरताना प्रतिस्पर्धी खेळाडूंनी त्याला जमिनीवर पाडले. विमलराजला रोखण्यात एका खेळाडूचा पाय त्याच्या छातीवर पडला. पण त्यानंतर जे समोर आले त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 26 Jul 2022, 9:28 pm
नवी दिल्ली : कबड्डीचा सामना सुरु असताना एक दुर्देवी घटना घडल्याचे आता समोर आले आहे. कबड्डीचा लाइव्ह सामना सुरु असताना एका खेळाडूचा मृत्यू झाल्याची बाब आज सर्वांसमोर आली आहे. तामिळनाडूतील पाणरुथीजवळील मनादिकुप्पम गावात एका कबड्डीपटूचा सामन्यादरम्यान मृत्यू झाला. रविवारी जिल्हास्तरीय स्पर्धा सुरु असताना हा अपघात झाला, मात्र मंगळवारी ही बाब उघडकीस आली. विमलराज, असे या खेळाडूचे नाव आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kabaddi
विमलराज (सौजन्य-सोशल मीडिया)


हा सामना सुरु असताना विमलराजच्या संघाची चढाई करण्याची पाळी आली होती. त्यावेळी संघाकडून विमलराजला चढाई करण्यासाठी पाठवण्यात आले. तो चढाई करण्यासाठी शिरला. त्यावेळी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी त्याला घेरण्याचा प्रयत्न केला. विमलराजला घेरताना प्रतिस्पर्धी खेळाडूंनी त्याला जमिनीवर पाडले. विमलराजला रोखण्यात प्रतिस्पर्धी संघातील एका खेळाडूचा पाय त्याच्या छातीवर पडला. पण तरीही विमलराजला बाद करण्यात प्रतिस्पर्धी संघाला यश आले नाही. कारण विमलराजने यावेळी दोन गुणांची कमाई केली होती. पण या यशस्वी चढाईनंतर मात्र विमलराज उठू शकला नाही. काही वेळ त्याला उठवण्याचा प्रयत्न दोन्ही संघांतील खेळाडूंकडून करण्यात आला, पण तो प्रतिसाद देत नसल्याचे पाहून त्याला लगेच रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

विमलराजला रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. त्यानंतर पोलिसही रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी यावेळी विमलराजचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोस्टमॉर्टमनुसार हृदयविकाराच्या झटक्याने विमलराजचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. पण याबाबत अधिकृत माहिती पोलिसांनी दिलेली नाही. पोलिसांना याबाबत गुन्हा दाखल केला आहे आणि त्याचा तपास ते करत आहेत. या दुर्देवी घटनेनंतर खेळाडू आणि विमलराजच्या कुटुंबीयांची अवस्था बिकट झाली आहे. विमलचा कबड्डी खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मृतदेहासोबत ट्रॉफीही पुरण्यात आली...विमलच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याचे वडील विमलराजच्या मृतदेहासोबत विजयी ट्रॉफीवर दफन करताना दिसत आहेत.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख