म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्हा सायकलिंग संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. विजय व्यवहारे आणि सचिवपदी चरणजितसिंग संघा यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
औरंगाबाद जिल्हा सायकलिंग संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभेत संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात डॉ. विजय व्यवहारे यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाली. हिरालाल सलामपुरे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. चरणजितसिंग संघा यांचीही सचिवपदी फेरनिवड करण्यात आली. अतुल जोशी यांची सहसचिव तर कोषाध्यक्ष म्हणून जगदीपसिंग संघा यांची निवड झाली आहे. अभिजित कुलकर्णी, विनय देव, सुशील मापारी, निनाद खोचे, सचिंद्र शुक्ला, सुरेश यादव, उत्तम चव्हाण, अजय गाडेकर, उन्मेष मारवाडे, ऋषिकेश पाठकुळे यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे.