अ‍ॅपशहर

कोरियात चमकला कोल्हापूरचा शाहू, विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी

कोरिया येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत शाहू माने हा कोल्हापूरचे प्रतिनिधीत्व करत आहे. त्याने पात्रता फेरीत सर्वाधिक ६३४.३ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. त्याला मेहुली घोष हिने उत्तम साथ दिली. त्यानंतर अंतिम फेरीत शाहू व मेहुली यांनी अतिशय उत्तम कामगिरी करत प्रतिस्पर्धी हंगेरीच्या इस्तवान पेनी व इस्तर मेसझारोस यांचा १७ विरूध्द १३ अशा फरकाने पराभव करत सुवर्णपदक पटकाविले

Authored byगुरुबाळ माळी | Edited byप्रसाद लाड | Maharashtra Times 13 Jul 2022, 11:07 pm
कोल्हापूर : विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत कोल्हापूरच्या शाहू माने याने भारताचे नाव उंचावले. कोरिया येथील चांगवान येथे सुरू असलेल्या नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल मिश्र या प्रकारात त्याने चमकदार कामगिरी करत भारताला हे सुवर्णपदक मिळवून दिले. गुरूपोर्णिमेनिमित्त त्याने प्रशिक्षिका सुमा शिरूर यांना आगळी वेगळी भेट दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gold medal for india
भारताला सुवर्णपदक (सौजन्य-सोशल मीडिया)

कोरिया येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत शाहू माने हा कोल्हापूरचे प्रतिनिधीत्व करत आहे. त्याने पात्रता फेरीत सर्वाधिक ६३४.३ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. त्याला मेहुली घोष हिने उत्तम साथ दिली. त्यानंतर अंतिम फेरीत शाहू व मेहुली यांनी अतिशय उत्तम कामगिरी करत प्रतिस्पर्धी हंगेरीच्या इस्तवान पेनी व इस्तर मेसझारोस यांचा १७ विरूध्द १३ अशा फरकाने पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. त्याने यापूर्वी अर्जेंटिना येथे झालेल्या युथ ऑलिम्पिक मध्येही रौप्यपदक मिळवले होते. याशिवाय ज्युनिअर गटात कतार येथे झालेल्या आशियाई शुटींग स्पर्धेत कास्यपदक मिळवले होते. शाहू हा कोल्हापुरातील केआयटी कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. त्याला संस्थेचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले, कार्यकारी संचालक डॉ. व्ही.व्ही. कार्जीनी, प्रभारी संचालक डॉ.एम. एम. मुजुमदार व डॉ. उदय भापकर यांचे मार्गदर्शन लाभले.

महत्वाचे लेख