अ‍ॅपशहर

दौलताबाद घाटात आज मॅरेथॉन रंगणार

म टा प्रतिनिधी, औरंगाबादऔरंगाबाद ब्लॅक बक्सतर्फे आयोजित एमआयटी हेरिटेज अर्ध मॅरेथॉन स्पर्धा रविवारी दौलताबाद घाटात रंगणार आहे...

Maharashtra Times 25 Nov 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद ब्लॅक बक्सतर्फे आयोजित एमआयटी हेरिटेज अर्ध मॅरेथॉन स्पर्धा रविवारी दौलताबाद घाटात रंगणार आहे. स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. स्पर्धेनिमित्ताने शनिवारी आयोजित रेस एक्स्पोमध्ये धावपटूंनी फिटनेश चॅलेंज स्वीकारत आपले कौशल्य सिद्ध केले.

या स्पर्धेत औरंगाबादसह महाराष्ट्र तसेच देश-विदेशातूनही धावपटूंनी सहभाग नोंदवला आहे. ऐतिहासिक दौलताबाद किल्ला ते जगप्रसिद्ध वेरुळ लेणी या मार्गावर ही मॅरेथॉन होत आहे. दहा किलोमीटर, एकवीस किलोमीटर व पंचवीस किलोमीटर अशा तीन अंतरांची तसेच महिला व पुरुषांच्या प्रत्येकी आठ गटात स्पर्धा होणार आहे. मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना एकूण चार लाखांची रोख पारितोषिके व मेडल्स देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत टायमिंग टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्यात येणार आहे. स्पर्धा संचालक म्हणून ज्येष्ठ मॅरेथॉनपटू व्यंकट हे काम पाहात आहेत.

मॅरेथॉन स्पर्धेच्यानिमित्ताने शनिवारी एमआयटीत रेस एक्स्पोचे आयोजन करण्या आले होते. यज्ञवीर कवडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मुकुंद भोगले, मुनीष शर्मा, डॉ. साहुजी, विजय आघाव, डॉ. मंगेश पानट आदी उपस्थित होते. फिटनेस चॅलेंजचा प्रारंभ संजीव ऑटोच्या मैथिली तांबटकर, एमआयटीचे महासंचालक मुनीष शर्मा यांच्या प्रत्यक्ष सहभागाने झाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज