अ‍ॅपशहर

शारीरिक छळ केल्यावरून फुटबॉल प्रशिक्षकाची गच्छंती

भारताच्या १७ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल संघाचे प्रशिक्षक निकोलाय अॅडम यांना मुलांचा शारीरिक छळ केल्याच्या आरोपावरून पदावरून हटविण्यात येणार आहे. काही खेळाडूंनी निकोलाय आणि सहप्रशिक्षक एतिबार निझामी यांच्याकडून शारीरिक छळ होत असल्याची तक्रार आपल्या पालकांकरवी फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडे केली होती. त्याआधारावर पटेल यांनी निकोलाय यांना पद सोडण्यास सांगितले अथवा हकालपट्टी केली जाईल असा इशारा दिला. दोन वर्षांपूर्वी निकोलाय यांची नियुक्ती प्रशिक्षक म्हणून करण्यात आली होती. मुलांचे पालक मानवी हक्क आयोगाकडे जाण्याची शक्यता लक्षात घेऊन ही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Maharashtra Times 26 Jan 2017, 4:00 am
नवी दिल्ली : भारताच्या १७ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल संघाचे प्रशिक्षक निकोलाय अॅडम यांना मुलांचा शारीरिक छळ केल्याच्या आरोपावरून पदावरून हटविण्यात येणार आहे. काही खेळाडूंनी निकोलाय आणि सहप्रशिक्षक एतिबार निझामी यांच्याकडून शारीरिक छळ होत असल्याची तक्रार आपल्या पालकांकरवी फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडे केली होती. त्याआधारावर पटेल यांनी निकोलाय यांना पद सोडण्यास सांगितले अथवा हकालपट्टी केली जाईल असा इशारा दिला. दोन वर्षांपूर्वी निकोलाय यांची नियुक्ती प्रशिक्षक म्हणून करण्यात आली होती. मुलांचे पालक मानवी हक्क आयोगाकडे जाण्याची शक्यता लक्षात घेऊन ही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम u 17 football coach nicolai set to be shown the door
शारीरिक छळ केल्यावरून फुटबॉल प्रशिक्षकाची गच्छंती


या मुलांच्या पालकांनी पटेल यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी म्हटले होते की, एतिबार हे मुलांना मारतात. फुटबॉल फेडरेशनने मात्र निकोलाय यांची हकालपट्टी करण्यात आली नसल्याचे म्हटलेले असले तरी हे प्रकरण आणखी चिघळू नये म्हणून निकोलाय यांना स्वतःहून राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. पण तूर्तास निकोलाय यांनी राजीनामा देण्यास नकार दिला असल्याचे कळते. मात्र राजीनामा न देण्यावर ते ठाम राहिले तर त्यांची हकालपट्टी करण्यात येणार आहे.

भारताचा १७ वर्षांखालील मुलांचा संघ नुकताच रशियातील स्पर्धेत सहभागी झाला होता. पण १६ संघांच्या या स्पर्धेत भारताला तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज