अ‍ॅपशहर

भारताची अमेरिकेशी सलामी

येत्या ऑक्टोबरपासून भारतात होत असलेल्या १७ वर्षांखालील मुलांच्या वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेसाठी शुक्रवारी ड्रॉ जाहीर करण्यात आला. त्यात भारताला अ गटात घाना, अमेरिका व कोलंबिया या देशांसह स्थान देण्यात आले आहे. ६ ऑक्टोबरला भारताची सलामीची लढत अमेरिकेशी होणार असून त्यानंतर ९ ऑक्टोबरला भारत-कोलंबिया असा सामना होईल.

Maharashtra Times 8 Jul 2017, 4:00 am
वृत्तसंस्था, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम u 17 football draw announce india play opening round with america
भारताची अमेरिकेशी सलामी


येत्या ऑक्टोबरपासून भारतात होत असलेल्या १७ वर्षांखालील मुलांच्या वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेसाठी शुक्रवारी ड्रॉ जाहीर करण्यात आला. त्यात भारताला अ गटात घाना, अमेरिका व कोलंबिया या देशांसह स्थान देण्यात आले आहे. ६ ऑक्टोबरला भारताची सलामीची लढत अमेरिकेशी होणार असून त्यानंतर ९ ऑक्टोबरला भारत-कोलंबिया असा सामना होईल. गटसाखळीतील भारताची अखेरची लढत घानाशी १२ ऑक्टोबरला नवी दिल्लीत होत आहे. घानाने १९९१ व १९९५मध्ये विजेतेपद पटकाविलेले आहे.

या स्पर्धेतील सलामीच्या लढती घाना व कोलंबिया (अ गट) तसेच न्यूझीलंड – टर्की (ब गट) अशा होतील. हे सामने अनुक्रमे नवी दिल्ली व मुंबईत होणार आहेत.

प्रसिद्ध फुटबॉलपटू इस्तेबान कॅम्बियासो, एनवान्को कानू तसेच भारताची ऑलिम्पिक रौप्यविजेती पी. व्ही. सिंधू व भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील चेत्री यांच्या उपस्थितीत हा ड्रॉ जाहीर करण्यात आला.

भारताच्या गटातील तिन्ही लढती दिल्लीत होणार असून स्पर्धेतील अन्य सामने मुंबई, कोची, गोवा, गुवाहाटी व कोलकाता येथे होतील.

प्रत्येक गटातील दोन अव्वल संघ तसेच तिसऱ्या क्रमांकावरील चार सर्वोत्तम संघ हे अंतिम १६ संघात स्थान मिळवतील. ती फेरी १६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. २१ व २२ ऑक्टोबरला उपांत्यपूर्व फेरीचे सामने होणार असून २५ ऑक्टोबरला उपांत्य फेरी होईल. या दोन्ही लढती गुवाहाटी व नवी मुंबईत होत आहेत.

तिसऱ्या क्रमांकासाठी होणारी लढत तसेच अंतिम सामना २८ ऑक्टोबरला कोलकात्यात होईल.

भारत, न्यू कॅलेडोनिया व नायगर हे संघ प्रथमच या स्पर्धेत खेळत आहेत.

गट असे असतील –

अ गट

भारत, अमेरिका, घाना, कोलंबिया

ब गट

टर्की, माली, न्यूझीलंड, पराग्वे

क गट

इराण, गिनी, जर्मनी, कोस्टारिका

ड गट

उत्तर कोरिया, नायगर, ब्राझिल, स्पेन

इ गट

होन्डुरास, जपान, न्यू कॅलिडोनिया, फ्रान्स

फ गट

इराक, मेक्सिको, चिली, इंग्लंड

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज