नवी दिल्ली:
भारतीय कुस्ती महासंघाशी (WFI) सर्व संबंध तोडून टाकावेत, अशा सूचना जागतिक कुस्ती संघटनेनं इतर सर्व राष्ट्रीय संघटनांना दिले आहेत. नुकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धेत भारतानं पाकिस्तानी नेमबाजांना व्हिसा नाकारला होता. त्यामुळं जागतिक कुस्ती संघटनेनं हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी नेमबाजांना व्हिसा नाकारल्यानं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं यापुढे भारतात आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता जागतिक कुस्ती संघटनेनं भारताला आणखी एक झटका दिला आहे. त्यांनी इतर राष्ट्रीय संघांना पत्र लिहून भारतीय कुस्ती महासंघासोबतचे सर्व संबंध तोडून टाकावेत, अशा सूचना दिल्या आहेत. यासंबंधी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण आणि सहायक सचिव विनोद तोमर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
भारतीय कुस्ती महासंघाशी (WFI) सर्व संबंध तोडून टाकावेत, अशा सूचना जागतिक कुस्ती संघटनेनं इतर सर्व राष्ट्रीय संघटनांना दिले आहेत. नुकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धेत भारतानं पाकिस्तानी नेमबाजांना व्हिसा नाकारला होता. त्यामुळं जागतिक कुस्ती संघटनेनं हा निर्णय घेतला आहे.