पुणे : श्रीकांत जाधव (९), रिशांक देवाडिगा (८), सुरेंदर गिल (७) यांच्या आक्रमक चढायांच्या जोरावर यूपी योद्धा संघाने प्रो-कबड्डी लीगमध्ये सोमवारी जयपूर पिंक पँथर्स संघावर ३८-३२ अशी मात केली. या विजयाने यूपी योद्धा संघाने पाचवे स्थान पटकावले. यूपी योद्धाचा हा सलग पाचवा विजय ठरला. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलात ही स्पर्धा सुरू आहे. यूपी योद्धाने जयपूरवर दोन लोण चढवीले. जयपूरकडून दीपक हुडाने (१३) सुपर-१० कामगिरी केली खरी; पण त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. यूपी संघाचा हा १५ सामन्यांतील आठवा विजय ठरला.
'यूपी पाचव्या स्थानी
श्रीकांत जाधव (९), रिशांक देवाडिगा (८), सुरेंदर गिल (७) यांच्या आक्रमक चढायांच्या जोरावर यूपी योद्धा संघाने प्रो-कबड्डी लीगमध्ये सोमवारी जयपूर पिंक ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Sep 2019, 4:00 am