अ‍ॅपशहर

‘वर्ल्ड ब्लिट्झ’मध्ये आनंदला ब्राँझपदक

भारताचा आघाडीचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत ब्राँझपदक पटकावले.

Maharashtra Times 31 Dec 2017, 4:01 am
रियाध : भारताचा आघाडीचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत ब्राँझपदक पटकावले. पहिल्या दिवशी आनंदला एक पराभव पत्करावा लागला होता. वर्ल्ड रॅपिड बुद्धिब‍ळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या आनंदने शनिवारी आपला खेळ उंचावत अखेरच्या १० डावांमध्ये ७.५ गुणांची कमाई केली. त्यामुळे आनंदच्या खात्यात एकूण १४.५ गुण झाले. नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने या स्पर्धेत १६ गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले. रशियाच्या सर्जेई कार्जाकिन (१४.५) रौप्यपदकाचा मानकरी ठरला. आनंदने या स्पर्धेत एकूण ९ विजय मिळवले, तर ११ फेऱ्या बरोबरीत सोडविल्या. या स्पर्धेत एकूण २१ फेऱ्या झाल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज