अ‍ॅपशहर

वीरधवलला रौप्य

सिंगापूरमधील एज ग्रुप जलतरणमटा...

Maharashtra Times 17 Mar 2018, 2:27 am

सिंगापूरमधील एज ग्रुप जलतरण

महाराष्ट्र टाइम्स.कॉम young swimmer virdhawal khade wins silver at national age group championships
वीरधवलला रौप्य


म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

पुढील महिन्यात होत असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी तयारी करत असलेला महाराष्ट्राचा आघाडीचा जलतरणपटू वीरधवल खाडे याने स्पर्धात्मक जलतरणात पुन्हा एकदा यशस्वी सूर मारला असून सिंगापूर येथे सुरू असलेल्या नॅशनल एज ग्रुप स्पर्धेत त्याने ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात रौप्यपदक जिंकले. गोल्ड कोस्ट येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी सज्ज असलेल्या वीरधवलने २४.७३ सेकंद अशी वेळ दिली. ऑलिम्पिकपटू आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित वीरधवलने या कामगिरीनंतर सांगितले की, राष्ट्रीय जलतरण स्पर्धेपेक्षाही आता मी अधिक तंदुरुस्त आहे आणि माझ्या कामगिरीचा आलेख आणखी उंचावत जाईल. ही एक योग्य सुरुवात झाली असे वाटते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज