अ‍ॅपशहर

औरंगाबादचा नीरज रिंगणगावकर विजेता

म टा...

Maharashtra Times 25 Sep 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बारा वर्षांखालील अखिल भारतीय रॅकिंग टॅलेंट सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत औरंगाबादच्या नीरज रिंगणगावकर आणि पुण्याच्या अलिना शेख यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटाकावले.

विभागीय क्रीडा संकुलातील एन्ड्युरन्स टेनिस सेंटरमध्ये सोमवारी या स्पर्धेचा समारोप झाला. मुलांच्या गटात अंतिम सामन्यात औरंगाबादच्या नीरज रिंगणगावकरने नाशिकच्या अद्वैत भातखंडेचा ६-४, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करुन विजेतेपद पटाकावले. मुलींच्या गटात पुण्याची अलिना शेख विजेती ठरली. तिने अंतिम लढतीत कोल्हापूरच्या नैनिका रेड्डीवर ९-४ असा विजय नोंदवला.

जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी टेनिस सेंटरचे प्रमुख आशुतोष मिश्रा, सचिन पुरी, प्रवीण गायसमुद्रे, गजेंद्र भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपांत्य फेरीचे निकाल मुले : नीरज रिंगणगावकर (औरंगाबाद) वि. वि. पार्थ सोमाणी (औरंगाबाद) ९-४, अद्वैत भातखंडे (नाशिक) वि. वि. लक्ष गुजराथी (नाशिक) ९-६.

मुलींचा गट : अलिना शेख (पुणे) वि. वि. धनश्री पाटील (नाशिक) ९-४, नैनिका रेड्डी (कोल्हापूर) वि. वि. तेजस्वीनी सिरफुले (नांदेड) ९-२.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज