अ‍ॅपशहर

फ्रेंच ओपन: अॅश्ले बार्टीने जिंकला पहिला ग्रँडस्लॅम

​ऑस्ट्रेलियाच्या अॅश्ले बार्टीने यंदाच्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद पटकावले आहे. २३ वर्षांच्या बार्टीने चेक प्रजासत्ताकच्या मार्केता व्हाँड्रॉसोव्हावर ६-१, ६-३ अशी मात करत फ्रेंच जेतेपदाचा मान मिळवला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Jun 2019, 10:50 pm
पॅरिस:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ashleigh


ऑस्ट्रेलियाच्या अॅश्ले बार्टीने यंदाच्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद पटकावले आहे. २३ वर्षांच्या बार्टीने चेक प्रजासत्ताकच्या मार्केता व्हाँड्रॉसोव्हावर ६-१, ६-३ अशी मात करत फ्रेंच जेतेपदाचा मान मिळवला.

बार्टीच्या खेळात विविधता होती. आक्रमकता आणि संयम याचा मिलाफ साधत तिने फोरहँड विनरचा मारा करत पहिला सेट खिशात टाकला. दुसऱ्या सेटमध्ये व्हाँड्रॉसोव्हाने थोडीफार झुंज दिली; पण बार्टीने वेळीच सर्व्हिस मोडून आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राखली. मार्गरेट कोर्ट यांनी १९७३मध्ये फ्रेंच ओपन जिंकली होती. त्यानंतर फ्रेंच ओपन जिंकणारी बार्टी ही पहिलीच ऑस्ट्रेलियन टेनिसपटू (पुरुष आणि महिला) ठरली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज