नवी दिल्ली : भारताच्या जीवन नेदुन्चेळीयनने सलग दुसरा 'चॅलेंजर' किताब मिळवला. त्याने मार्सेलो अरेव्हॅलोच्या साथीने मेक्सिको येथे झालेल्या माँटेरेय एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. अंतिम फेरीत जीवन-मार्सेलो जोडीने लिअँडर पेस-मिगूएल अँजेल रेयास-व्हरेला जोडीवर ६-१, ६-४ असा विजय मिळवला. जीवनने गेल्या आठवड्यात एटीपी चेंगडू ओपन स्पर्धा जिंकली होती. चॅलेंजर सर्किटमधील जीवनचे हे चौथे विजेतेपद ठरले.
जीवन नेदुन्चेळीयनला जेतेपद
भारताच्या जीवन नेदुन्चेळीयनने सलग दुसरा 'चॅलेंजर' किताब मिळवला...
Maharashtra Times 9 Oct 2018, 4:00 am