अ‍ॅपशहर

फ्रेंच ओपनः नदाल तिसऱ्या फेरीत

रफाएल नदालने बुधवारी फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या लढतीत जर्मनीच्या यानिक मादेनला किंचीतही संधी न देता ६-१, ६-२, ६-४ असा विजय नोंदवत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत विक्रमी बाराव्या जेतेपदाकडे कूच करणाऱ्या नदालला मादेनकडून पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत फारशी झुंज अनुभवायला मिळालीच नाही.

महाराष्ट्र टाइम्स 30 May 2019, 4:00 am
पॅरिसः रफाएल नदालने बुधवारी फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या लढतीत जर्मनीच्या यानिक मादेनला किंचीतही संधी न देता ६-१, ६-२, ६-४ असा विजय नोंदवत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत विक्रमी बाराव्या जेतेपदाकडे कूच करणाऱ्या नदालला मादेनकडून पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत फारशी झुंज अनुभवायला मिळालीच नाही. तिसऱ्या फेरीत त्याने नदालला किंचीत झुंजवले; पण मादेनचा प्रयत्न तोकडाच ठरला. दरम्यान स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररनेही आगेकूच केली ती प्रतिस्पर्धी ओत याच्यावर ६-४, ६-३, ६-४ अशी मात करून.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nadal

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज