अ‍ॅपशहर

विम्बल्डन: उत्कंठावर्धक लढत; जोकोविच विजेता

आठवेळा विम्बल्डनचे विजेतेपद पटकाविणारा टेनिसचा बादशाह रॉजर फेडरर आणि जागतिक क्रमवारीतला अव्वल सर्बियाचा नोव्हाक जोकोविच यांच्यातील अत्यंत उत्कंठावर्धक लढतीत अखेर जोकोविचने फेडररला नमवले. ७-६,१-६,७-६,४-६,१३-१२ अशा सेटमध्ये जोकोविचने जेतेपद खेचून आणले. सर्वात जास्त वेळ चाललेली ही ऐतिहासिक अंतिम फेरी ठरली आहे. पाचवा निर्णायक सेट तर तब्बल १०० मिनिटांहून अधिक वेळ सुरू होता. हा संपूर्ण सामना चार तास ५७ मिनिटे चालला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jul 2019, 12:04 am
लंडन:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम novak-djokovic1


आठवेळा विम्बल्डनचे विजेतेपद पटकाविणारा टेनिसचा बादशाह रॉजर फेडरर आणि जागतिक क्रमवारीतला अव्वल सर्बियाचा नोव्हाक जोकोविच यांच्यातील अत्यंत उत्कंठावर्धक लढतीत अखेर जोकोविचने फेडररला नमवत पाचवे विम्बल्डन जिंकले. ७-६,१-६,७-६,४-६,१३-१२ अशा सेटमध्ये जोकोविचने जेतेपद खेचून आणले. सर्वात जास्त वेळ चाललेली ही ऐतिहासिक अंतिम फेरी ठरली आहे. पाचवा निर्णायक सेट तर तब्बल १०० मिनिटांहून अधिक वेळ सुरू होता. हा संपूर्ण सामना चार तास ५७ मिनिटे चालला.

जागतिक किर्तीचे बलाढ्य स्पर्धक जेव्हा आमनेसामने भिडतात, तेव्हा खेळ किती रोमांचक होऊ शकतो याची झलक रविवारी टेनिसप्रेमींनी पाहिली. कधी जोकोविचचं पारडं जड तर दुसऱ्याच क्षणी फेडररच्या बाजुने खेळ झुकायचा. तब्बल चार तास ५७ मिनिटे हा अंतिम फेरीचा सामना रंगला. पहिल्या दोन्ही सेटमध्ये दोघांनी बरोबरी केल्याने पाचव्या सेटसाठी दोघांनी कडवी झुंज दिली. पाचव्या सेटमध्ये १२-१२ असा स्कोअर झाल्यानंतर टायब्रेक झाले.

जोकोविच आणि फेडरर यांच्यातला हा ४८ वा सामना होता. जोकोविच फेडररविरुद्ध मागील सहापैकी पाच सामने जिंकला होता आणि हा सामनाही अटीतटीत लढून त्याने आपलं वर्चस्व सिद्ध केले.

रॉजर फेडरर (२० ग्रँडस्लॅम)

ऑस्ट्रेलियन ओपन - ६
फ्रेंच ओपन - १
विम्बल्डन - ८
अमेरिकन ओपन - ५
-----------------

नोव्हाक जोकोविच (१५ ग्रँडस्लॅम)

ऑस्ट्रेलियन ओपन - ७
फ्रेंच ओपन - १
विम्बल्डन - ४
अमेरिकन ओपन - ३

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज