लंडन : गतविजेत्या अँजेलिक कर्बरला प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला. अमेरिकेच्या लॉरेन डेव्हिसने जर्मनीच्या कर्बरवर २-६, ६-२, ६-१ अशी मात केली आणि तिसरी फेरी गाठली. 'टॉप टेन'मधील खेळाडूवर लॉरेनने तिसऱ्यांदा विजय नोंदविला. जागतिक क्रमवारीत २५ वर्षीय लॉरेन ९५व्या, ३१ वर्षीय अँजेलिक पाचव्या क्रमांकावर आहे.
गतविजेत्या कर्बरला धक्का
गतविजेत्या अँजेलिक कर्बरला प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jul 2019, 4:00 am