अ‍ॅपशहर

टेनिस विश्वाला मोठा धक्का; सेरेना विल्यम्सने दिले निवृत्तीचे संकेत, मानाच्या स्पर्धेनंतर अलविदा

Serena williams : महिलांमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विश्वविक्रम सेरेनाच्या नावावर आहे. सेरेना ३६५ ग्रँड स्लॅम सामने जिंकून ती महिलांमध्ये प्रथम स्थानावर आहे. सेरेनाने तिच्या कारकिर्दीत २३ ग्रँड स्लॅम एकेरी जेतेपदं जिंकली आहेत, मार्गारेट कोर्टच्या नावावर सर्वात जास्त २४ जेतेपदे आहेत. पण टेनिसचा विचार केला तर सेरेनालाच सर्वकालिन सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू मानली जाते. कारण तिने आपल्या खेळाने महिला टेनिसला नवा आयाम दिला होता.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 9 Aug 2022, 8:14 pm
नवी दिल्ली : टेनिस विश्वाला आज एक मोठा धक्का बसला. कारण टेनिस विश्वास ब्लॅक ब्यूटी या नावाने प्रसिद्ध असलेल्या सेरेना विल्यम्सने आज आपल्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत. टेनिस विश्वातील मानाच्या ग्रॅडस्लॅम स्पर्धेनंतर ती निवृत्ती घेणार असल्याचे समोर येत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम serena Williams
सौजन्य-ट्विटर


एका खास मुलाखतीमध्ये सेरेना म्हणाली होती की, "आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला वेगळ्या दिशेने जाण्याचा निर्णय घ्यावा लागतो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर खूप प्रेम करतो आणी ती गोष्ट आपल्याला सोडण्याची वेळ येते तेव्हा तो काळ नेहमीच कठीण असतो. मी नेहमीच टेनिसचा आनंद घेते. मात्र, आता माझा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. मी आता आई झाले आहे. त्यामुळे आयुष्यात बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. आता काही गोष्टींना प्रधान्य द्यायचे मी ठरवले आहे. पुढील काही आठवडे मी टेनिसचा मनमुराद आनंद लुटणार आहे."

सेरेनाने तिच्या कारकिर्दीत २३ ग्रँड स्लॅम एकेरी जेतेपदं जिंकली आहेत, मार्गारेट कोर्टच्या नावावर सर्वात जास्त २४ जेतेपदे आहेत. पण टेनिसचा विचार केला तर सेरेनालाच सर्वकालिन सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू मानली जाते. कारण तिने आपल्या खेळाने महिला टेनिसला नवा आयाम दिला होता. सेरेनाने आपला एक दबदबा निर्माण केला होता. सेरेना पुरुष टेनिसपटूंबरोबर उतरली तर ती त्यांनाही पराभूत करू शकेल, असे चाहते म्हणायचे. टेनिस कोर्टवर जोरकस फटक्यांसाठी ती प्रसिद्ध होती. सेरेनाची बहीण व्हीनसदेखी टेनिसपटूच होती. पण व्हीनसपेक्षा सेरेनाने जास्त सामने जिंकले आणि टेनिस विश्वास आपले एकेकाळ निर्विवाद वर्चस्व राखले होते. पण गेल्या काही वर्षांच तिच्या आयुष्यात बरेच बदल झाले आहेत. त्यामुळे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेनंतर ती निवृत्ती घेऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.

महिलांमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विश्वविक्रम सेरेनाच्या नावावर आहे. सेरेना ३६५ ग्रँड स्लॅम सामने जिंकून ती महिलांमध्ये प्रथम स्थानावर आहे. त्यानंतर महिलांमध्ये दुसऱ्या स्थानावर मार्टिना नवरातिलोव्हा आहे. मार्टिना नवरातिलोव्हाने ३०५ सामने जिंकले होते. त्यामुळे आता सेरेनाचा हा विक्रम कोणी मोडू शकेल, असे सध्याच्या घडीला तरी दिसत नाही.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज