अ‍ॅपशहर

Tokyo Olympics 2021 : टोकियो ऑलिम्पिक कुठे, कधी, कसे पाहू शकता, जाणून घ्या एकच क्लिकवर...

टोकिओ ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा कधी सुरु होणार, तो कुठे पाहता येणार, त्याचबरोबर ऑलिम्पिकमधील स्पर्धा कुठे लाइव्ह पाहता येणार, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर एक क्लिक करा आणि सर्व माहिती जाणून घ्या. टोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा जपान नॅशनल स्टेडियमवर होणार आहे. पण कोरोनामुळे या उद्घाटन सोहळ्यास प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार नाही.

Lipi 23 Jul 2021, 3:47 pm
पुणे : टोकियो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला अवघा काही वेळ शिल्लक राहिला आहे. पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही स्पर्धा पार पडणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tokyo olympics 2020 live streaming when and where to watch online free know only on one click
Tokyo Olympics 2021 : टोकियो ऑलिम्पिक कुठे, कधी, कसे पाहू शकता, जाणून घ्या एकच क्लिकवर...

1) टोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा कधी होणार?
- टोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी 23 जुलै रोजी जपान नॅशनल स्टेडियमवर होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी साडे चार वाजता सुरू होईल.

2) टोकियो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण कोठे पाहू शकाल?
- टोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळ्याचे सोनी सिक्स आणि सोनी टेन थ्री वर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

3) टोकियो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे पाहता येईल?
- टोकियो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्हवर करणार येणार आहे. तसेच डीडी स्पोर्ट्स आणि दूरदर्शनवरदेखील टोकियो ऑलिम्पिकचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

काही ऑलिम्पिक स्पर्धांना याआधीच सुरवात झाली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये 206 देशातील सुमारे 11 हजार खेळाडू 33 क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंतचे सर्वात मोठे पथक पाठविले आहे. भारताचे 119 खेळाडूंनी वेगवेगळ्या खेळांमध्ये पात्रता दर्शवली आहे. पण उद्घाटन सोहळ्यात फक्त 20 खेळाडू सहभागी होणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिकसाठी काही नवीन नियम बनवण्यात आले आहेत.

दुसऱ्या दिवशी अनेक खेळाडूंना मैदानात उतरावे लागणार आहे, त्यामुळे त्यांना भाग घेता येणार नाही. उद्घाटन सोहळ्यासाठी भारताने पहिल्यांदाच दोन ध्वजवाहक जाहीर केले आहेत. हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह आणि सहा वेळची विश्वविजेती महिला बॉक्सर एमसी मेरी कोम हे उद्घाटन सोहळ्यावेळी ध्वजवाहक म्हणून भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. प्रत्येक देशाच्या फक्त सहा अधिकाऱ्यांना यात सहभागी होण्याची संधी मिळेल. जपानमध्ये कोरोनाचा वाढता आलेख लक्षात घेता स्पर्धेवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. बर्‍याच देशांचे नेते या उद्घाटन सोहळ्यात भाग घेणार होते, पण त्याबाबत कमी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आता सोहळा कसा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज