अ‍ॅपशहर

नगरसेवकाचा ‘अशोकस्तंभ’ वादात

म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगरकॅम्प २ मधील मधुबन चौकाच्या सुशोभिकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक मनोज लासी यांच्या निधीतून ‘कलश मजूर कामगार’ संस्थेने राष्ट्रीय चिन्ह असलेला अशोक स्तंभ उभारला होता.

Maharashtra Times 21 Aug 2016, 4:51 am
आयुक्तांच्या आदेशानंतर हटवला स्तंभ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ulhasnagar ashoksthambh
नगरसेवकाचा ‘अशोकस्तंभ’ वादात


म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगर

कॅम्प २ मधील मधुबन चौकाच्या सुशोभिकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक मनोज लासी यांच्या निधीतून ‘कलश मजूर कामगार’ संस्थेने राष्ट्रीय चिन्ह असलेला अशोक स्तंभ उभारला होता. त्यामुळे अशोकस्तंभाचा अवमान झाल्याचा आरोप करत मनसेने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आयुक्त आणि पोलिसांकडे केली होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री अचानक मधुबन चौकातील चबुतऱ्यावरून हा स्तंभ गायब झाला. दरम्यान, वाढत्या विरोधामुळे आयुक्तांनी सांगितल्यानंतर स्तंभ काढण्यात आला, असे लासी यांनी सांगितले आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मधुबन चौकाच्या सुशोभिकरणासाठी अशोकस्तंभाची प्रतिकृती उभारली होती. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक मनोज लासी यांचा तीन लाख रुपयांचा नगरसेवक निधी वापरण्यात आला आहे. हे काम कलश मजुर कामगार संस्थेला देण्यात आले होते. अशोकस्तंभाच्या अवमानाप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे ज्युनियर इंजिनियर, उप इंजिनियर, कार्यकारी अभियंता, शहर इंजिनियर, नगरसेवक निधी देणारे मनोज लासी, कलश मजूर कामगार संस्थेतील मजूर यांच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय चिन्ह कायदा २००५ अंतर्गत स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी सचिन कदम, सचिन बेंडके, मैनुद्दिन शेख आदींनी आयुक्त मनोहर हिरे आणि उल्हासनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शकील शेख यांच्याकडे वेदनाद्वारे केली होती. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याला सहा महिने ते दोन वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा पाच हजार रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
यामुळे दोषींमध्ये भीतीचे वातावरण होते. असे असतानाच शुक्रवारी रात्री हा स्तंभ मधुबन चौकातील चबुतऱ्यावरून गायब झाला आहे. हा स्तंभ चोरीला गेल्याची चर्चाही उल्हासनगरात रंगली होती. मात्र लासी यांनी स्तंभ काढून टाकल्याचे स्पष्ट केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज