इंटरनेट बँकिंगमुळे पैशांचे व्यवहार करणं आता आणखी सोपं आणि वेगवान झालं आहे. परंतु काही मंडळी याचा गैरफायदा घेतात. लोकांना खोट्या लिंक्स पाठवून त्यांची आर्थिक फसवणूक करतात. अशीच एक लिंक सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. ही लिंक SBI बँकेच्या नावाने व्हायरल केली जात आहे. तुमचं अकाउंट ब्लॉक झालंय. त्यामुळे या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते अनब्लॉक करू शकता असा मेसेज पाठवला जातोय. परंतु चुकूनही या मेसेजवर विश्वास ठेवू नका. कारण या मेसेजच्या माध्यमातून तुमची आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते.
नेमकं काय आहे या मेसेजमध्ये?
हा मेसेज SBI बँकेच्या ग्राहकांना पाठवला जात आहे. “तुमचे डॉक्युमेंट एक्सपायर झाले आहेत. परिणामी तुमचं अकाउंट ब्लॉक होऊ शकतं. त्यामुळे खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. आणि तुमचे डॉक्युमेंट अपडेट करा. अन्यथा तुमचं अकाउंट ब्लॉक होऊ शकतं.” असा मेसेज आणि इमेल व्हायरल होत आहे. परंतु PIB फॅक्ट चेकने दिलेल्या माहितीनुसार हा मेसेज पुर्णपणे खोटा आहे. अशा प्रकारच्या मेसेजवर विश्वास ठेवू नका. या मेसेजच्या माध्यमातून तुमची आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते.
व्हायरल मेसेजची उलटतपासणी कशी कराल?
सरकारी योजनेसंदर्भात कुठलीही माहिती खरी आहे की खोटी? याबाबत जाणून घेण्यासाठी PIB Fact Check अर्थात प्रेस इन्फोर्मेशन ब्यूरोची मदत घेतली जाऊ शकते. पीआयबी फॅक्ट चेकला संशयास्पद बातमीचा स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा URL पाठवा. तुमच्या शंका तुम्ही ९१८७९९७११२५९ या WhatsApp क्रमांकावरुन विचारू शकता. किवा pibfactcheck@gmail.com वर इमेल देखील करू शकता.