अ‍ॅपशहर

नव्या मेसेजने उडवली खळबळ, ४ पेक्षा अधिक वेळा ATM वापराल तर बसेल १७३ रुपयांचा टॅक्स

Fact Check about ATM: खरंच असा काही निर्णय घेण्यात आला आहे का? यापुढे तुमच्या बँक ट्रान्झॅक्शनवर मर्यादा येणार आहेक का? काय आहे या मेसेजचं सत्य? जाणून घेऊया या मेसेजचं फॅक्ट चेक.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Aug 2022, 2:49 pm
जर तुम्ही आपल्या बचत खात्यामधून वर्षाला ४० पेक्षा अधिक ट्रान्झॅक्शन केले तर प्रति ट्रॅन्झॅक्शन तुमचे ५७.५ रुपये कापले जातील. असा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा मेसेज केंद्र सरकार आणि रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नावानं व्हायरल होत आहे. परंतु खरंच असा काही निर्णय घेण्यात आला आहे का? यापुढे तुमच्या बँक ट्रान्झॅक्शनवर मर्यादा येणार आहेक का? काय आहे या मेसेजचं सत्य? जाणून घेऊया या मेसेजचं फॅक्ट चेक.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Fact Check about ATM


काय आहे या मेसेजमध्ये?

जर तुम्ही आपल्या सेव्हिंग बँक अकाउंटमधून वर्षाला ४० पेक्षा अधिक वेळा पैसे काढलेत तर प्रति ट्रॅन्झॅक्शन तुम्हाला ५७.५ रुपये टॅक्स द्यावा लागेल. शिवाय ATM कार्ड महिन्याला ४ पेक्षा अधिक वेळा वापरल्यास १७३ रुपये टॅक्स द्यावा लागेल असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अशा आशयाचा एक मेसेज व्हायरल होत आहे. परंतु PIB फॅक्ट चेकने दिलेल्या माहितीनुसार हा मेसेज खोटा आहे. असा कुठलाही निर्णय RBI ने घेतलेला नाही. या मेसेजद्वारे तुमची दिशाभूल केली जाऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका.


सरकारी योजनेसंदर्भात कुठलीही माहिती खरी आहे की खोटी याबाबत जाणून घेण्यासाठी PIB Fact Check अर्थात प्रेस इन्फोर्मेशन ब्यूरोची मदत घेतली जाऊ शकते. पीआयबी फॅक्ट चेकला संशयास्पद बातमीचा स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा URL पाठवा. तुमच्या शंका तुम्ही ९१८७९९७११२५९ या WhatsApp क्रमांकावरुन विचारू शकता. किवा pibfactcheck@gmail.com वर इमेल देखील करू शकता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग