अ‍ॅपशहर

या Youtube Channel वर ठेवू नका विश्वास, होऊ शकतं तुमचं नुकसान

PIB फॅक्ट चेकने दिलेल्या माहितीनुसार या व्हिडीओंमध्ये दिलेली माहिती खोटी आहे. अशा कुठल्याही योजना सरकारने सुरु केलेल्या नाहीत. या योजनांचा लाभ उचलण्याच्या नादात तुमचं आर्थिक नुकसान देखील होऊ शकतं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 May 2022, 6:49 pm
युट्यूब (YouTube) हे माहिती मिळवण्याचं एक उत्तम साधन आहे. आज जगभरातील लाखो-करोडो लोक दररोज युट्यूब वरील व्हिडीओ पाहतात. अनेक जण तर युट्यूबवर पैसे देखील कमावतात. परंतु काही मंडळी व्हिडीओ व्हायरल करण्याच्या नादात खोटी माहिती पसरवत आहेत. असंच एक युट्यूब चॅनेल सध्या चर्चेत आहे. या चॅनेलरुन मोदी सरकारच्या योजनांबाबत खोटी माहिती पसरवली जात आहे. Sarkari News Update असं या चॅनेलचं नाव आहे. https://bit.ly/3PJuncd या लिंकवरून हे व्हिडीओ शेअर केले जातात. मात्र PIB फॅक्ट चेकने दिलेल्या माहितीनुसार या व्हिडीओंमध्ये दिलेली माहिती खोटी आहे. अशा कुठल्याही योजना सरकारने सुरु केलेल्या नाहीत. त्यामुळे यावर विश्वास ठेवू नका. या योजनांचा लाभ उचलण्याच्या नादात तुमचं आर्थिक नुकसान देखील होऊ शकतं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Fact Check



सरकारी योजनेसंदर्भात कुठलीही माहिती खरी आहे की खोटी याबाबत जाणून घेण्यासाठी PIB Fact Check अर्थात प्रेस इन्फोर्मेशन ब्यूरोची मदत घेतली जाऊ शकते. पीआयबी फॅक्ट चेकला संशयास्पद बातमीचा स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा URL पाठवा. तुमच्या शंका तुम्ही ९१८७९९७११२५९ या WhatsApp क्रमांकावरुन विचारू शकता. किवा pibfactcheck@gmail.com वर इमेल देखील करू शकता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग