अ‍ॅपशहर

धक्कादायक! वृद्ध शेतकऱ्यानं धगधगत्या चितेत उडी मारून केली आत्महत्या

चितेत उडी मारण्यापूर्वी त्यांनी सरणाची विधिवत पूजा देखील केली होती. हा प्रकार पाहून पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Mar 2022, 1:32 pm
एका वृद्ध शेतकऱ्यानं स्वत:चं सरण रचून चितेत उडी मारल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना नागपूरच्या कुही तालुक्यातील किन्ही या गावात घडली. या घटनेमुळे सर्वांनाच आश्चर्याच धक्का बसला आहे. या व्यक्तीचं नाव आत्माराम मोतीराम ठवकर असं होतं. ते ८० वर्षांचे होते. ते आध्यात्मिक प्रवृत्तीचे व वारकरी संप्रदायाचे होते. लक्षवेधी बाब म्हणजे चितेत उडी मारण्यापूर्वी त्यांनी सरणाची विधिवत पूजा देखील केली होती. हा प्रकार पाहून पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hindu funeral


आत्महत्या करण्यापूर्वी मोतीराम यांनी रात्री गावात आयोजित केलेल्या नाटकाचा आनंद घेतला. त्यानंतर पहाटे ४ च्या सुमारास त्यांनी गावातील मंदिरात जावून पूजा केली. त्यानंतर ते शेतात गेले, लाकडं गोळा केली. अन् स्वत:चंच सरण तयार केलं. या सरणाची त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली. त्यानंतर सरण पेटवलं अन् पेटत्या चितेत उडी मारली. जेव्हा त्यांना बाहेर काढण्यातं आलं तेव्हा त्यांचं शरीर पूर्ण जळलं होतं. जळून त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेमुळे आत्माराम यांच्या कुटुंबीयांना जबरदस्त धक्का बसला आहे. आत्माराम ठवकर हे सधन कुटुंबातील व्यक्ती होते. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा आर्थिक ताण नव्हता. तरी देखील त्यांनी आत्महत्या का केली? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या घटनेची माहिती मिळताच त्वरीत कुटुंबीयांनी वेलतूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना पंचनामा दरम्यान, सरणावर अर्धवट मृतदेह व शेजारी पेटलेला दिवा आढळला. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नीतेश डोर्लीकर व शिपाई सुरपाम करीत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग