अ‍ॅपशहर

एका पंचमध्ये सिक्युरिटी गार्डचं डोकं फोडलं, ४५ लाख लोकांनी पाहिलेला Video तुम्ही पाहिला का?

१५ मिनिटांत ४५ लाख लोकांनी पाहिलेला हा व्हिडीओ तुम्ही पाहिला का? एअरपोर्टवर झालं कडाक्याचं भांडण, प्रवाशानं घातली सिक्युरिटी गार्डशी हुज्जत, एका पंचमध्ये फोडलं डोकं

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 May 2022, 12:29 pm
गेल्या काही काळात फायटिंगचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. (fighting video) अलिकडेच शाळेतील मुलींच्या हाणामारीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या हाणामारीत मुलांना देखील बदडून काढण्यात आलं होतं. (bangalore girl fight video) यानंतर आता आणखी एक व्हिडीओ चर्चेत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे १५ मिनिटांत तब्बल ४५ लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. दोन व्यक्ती एकमेकांशी फाईट करत आहेत. खरं तर आधी दोघांमध्ये मतभेद होतात. मग बोलता बोतला अचानक ते एकमेकांना मारू लागतात. (Brawl Breaks Out At Airport) त्यांची मारामारी पाहून पोलीस देखील मध्ये पडत नाहीत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम brawl breaks fight at airport 45 lakh people watch this video
एका पंचमध्ये सिक्युरिटी गार्डचं डोकं फोडलं, ४५ लाख लोकांनी पाहिलेला Video तुम्ही पाहिला का?



प्रवासी आणि गार्डमध्ये झटापट

व्हिडीओ पाहून असं वाटतंय की हे प्रकरण कुठल्याशा एअर पोर्टवरील आहे. जिथे सामान तपासण्यासाठी दिलं जातं तिथे सुरक्षारक्षक आणि प्रवाशामध्ये हे भांडण झालं. भांडणाचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. पण दोघं आधी एकमेकांना शिवीगाळ करताना दिसत आहेत. त्यानंतर सुरक्षारक्षक रागाच्या भरात त्याला थोबाडीत मारतो. मात्र त्यामुळे तो व्यक्ती आणखी चवताळतो आणि त्याच्या तोंडावर जोरदार मुक्के मारतो. (१ रुपयाही खर्च न करता खा पोटभर जेवण, महिलेने शोधलाय भन्नाट जुगाड)

४५ लाख लोकांनी पाहिलाय हा व्हिडीओ

एका पंचमध्ये गार्डला केलं गारद

मार खाल्लेला सुरक्षारक्षक अक्षरश: उडून खाली पडतो. एका पंचमध्ये त्याचं डोकं फुटतं. मात्र तो त्याही रक्तबंबाळ अवस्थेत उभा राहातो. आणि पुन्हा एकदा लढाई करण्यासाठी पुढे येतो. मात्र इतर गार्डमध्ये पडून त्यांचं भांडण सोडवतात. @DMNTnasa या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत ४५ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील दंगच व्हाल. (अतिशहाणपणा नडला! सिंहाच्या तोंडात बोटं घालणं पडलं महागात, जंगलाच्या राजाने दिली शिक्षा)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग