Dolly Chaiwala Shared Video With Rolls Royce Car Viral News In Marathi
चहा विकणारे काहीही करू शकतात, डॉली चायवाला उतरला ९ कोटींच्या गाडीतून, स्वॅग पाहून तरुणी झाल्या वेड्या
डॉली चायवाल्याला इतके पैसे मिळतात तरी कसे? डॉक्टर इंजिनियर्स हा व्हिडीओ पाहून करतायेत सवाल, पाहा कसा ९ कोटींच्या गाडीतून उतरत दाखवला स्वॅग
Authored byमंदार गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम29 Mar 2024, 3:13 pm
डॉली चायवाला सध्या खूपच चर्चेत आहे. कालपर्यंत तो केवळ एक चहाची टपरी चालवणारा सामान्य विक्रेता होता. पण आता त्याची फॅन फॉलोइंग एखाद्या सेलिब्रिटीसारखी वाढत चालली आहे. अन् अर्थातच या वाढत्या प्रसिद्धीमुळे मिळणारा आर्थिक लाभ देखील वाढत चाललं आहे. अन् याची झलक तुम्ही या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पाहू शकता. डॉली चायवाल्यानं चक्क रोल्स रॉयल्ससोबत काढलेला एक व्हिडीओ शेअर केलाय. लक्षवेधी बाब म्हणजे या गाडीची किंमत जवळपास ९ कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे ही गाडी मोठमोठ्या सेलिब्रिटींना देखील परवडत नाही. पण इतक्या महागड्या गाडीसोबत व्हिडीओ शेअर केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. काहींनी स्वत:च्या उच्च शिक्षणाची फिरकी घेत डॉलीचं कौतुक केलंय. (फोटो सौजन्य - dolly_ki_tapri_nagpur/Instagram)
कोण म्हणतं चहावाले रोल्स रॉयल्स खरेदी करू शकत नाही?
View this post on Instagram A post shared by D🫖LLY (@dolly_ki_tapri_nagpur)
हा व्हिडीओ देखील होतोय व्हायरल
View this post on Instagram A post shared by D🫖LLY (@dolly_ki_tapri_nagpur)
डॉलीचा नवा व्हिडीओ व्हायरल
हा व्हिडीओ डॉलीनं आपल्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो रोल्स रॉयल्स कारमधून उतरताना दिसतोय. एवढंच नव्हे तर, “कोण म्हणतं एक चहावाला रोल्स रॉयल्स खरेदी करू शकत नाही.” अशी एक मोटिव्हेशनल लाईन देखील त्यानं मारली आहे. त्याचा हा व्हिडीओ २ कोटी ७२ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलंय. कारण रोल्स रॉयल्स या कारमध्ये बसणं हे मोठमोठ्या सेलिब्रिटींना शक्य होत नाहीये. पण डॉलीनं काही दिवसांतच ते स्वप्न पूर्ण करून दाखवलं. त्यामुळे नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर जणू प्रतिक्रियांचा पाऊस पाडलाय, कोणी म्हणतेय, “हा आमच्या शिक्षणाची खिल्ली उडवतोय”, तर कोणी इतका पैसे मिळाला कसा? असा सवाल करतेय. काहींनी डॉलीची तुलना इंजिनियरिंग शिकलेल्या विद्यार्थ्यांशी देखील केली आहे. असो, तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काय वाटलं? तुम्ही देखील आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया नक्की द्या. (फोटो सौजन्य - dolly_ki_tapri_nagpur/Instagram)
"मंदार हा एक कुशल कंटेन्ट रायटर आहे. तो व्हायरल सेक्शनसाठी लिखाण करतो. त्याच्याकडे ७ वर्षांचा अनुभव आहे. व्हायरलसोबतच तो खेळ, मनोरंजन आणि राजकारण या विषयांवरही लिखाण करतो. आपल्या वाचकांना अचूक माहिती देण्यासाठी तो विविध विषयांवर संशोधन करतो. यापूर्वी त्याने प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्येही काम केले आहे. मंदारला छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वाचायला खूप आवडते. सोबतच त्याने विनोदी कथा, रहस्य कथा, विज्ञान कथा, भय कथा यांसारख्या विविध विषयांची पुस्तकं वाचली आहेत. वाचनासोबतच चित्रपट आणि नाटके पाहायला सुद्धा आवडतात. विशेषत: भय आणि विनोद या पठडीत मोडणाऱ्या कलाकृतींमध्ये विशेष रस आहे. तसेच मंदार फावल्या वेळेत कविता लिहिण्याची सुद्धा आवड आहे. मंदार आपल्या वाचकांची आवड आणि रूची समजून त्या अनुशंगाने लिखाण करतो. मंदारच्या लिखाणाची शैली ही फारच साधी आणि सोपी आहे. त्यामुळे त्याचे लिखाण लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातले लोक वाचू शकतात. वाचकांना अचूक माहिती देण्यासाठी मंदार वचनबद्ध आहे. आपल्या सर्जनशील लिखाण शैलीमुळे तो टीममधील एक महत्वाचा सदस्य आहे."... आणखी वाचा
We use cookies and other tracking technologies to provide services in line with the preferences you reveal while browsing the Website to show personalize content and targeted ads, analyze site traffic, and understand where our audience is coming from in order to improve your browsing experience on our Website. By continuing to browse this Website, you consent to the use of these cookies. If you wish to object such processing, please read the instructions described in our privacy policy/cookie policy.