अ‍ॅपशहर

इवल्याशा मिरचीत आहे १०० बॉम्बची पावर; एका मिनिटात जातो खाणाऱ्याचा जीव

या मिरचीसमोर तुम्हाला देवही वाचवू शकत नाही. ही इवलीशी मिरची इतकी तिखट आहे. की खाणाऱ्यांचे जीव देखील जातात.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Mar 2022, 10:12 pm
भारतीयांना तिखट, मसालेदार असे पदार्थ खायला प्रचंड आवडतात. त्यामुळे आपल्या खाद्य संस्कृतीत मिरचीला विशेष असं महत्व प्राप्त झालं आहे. पदार्थात जर मिरची किंवा मसाला नसेल तर हे काय पचपचीत केलं आहे? असे टोमणे मारले जातात. त्यामुळे मिरचीला पर्याय नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dragons breath hottest peppers in the world
इवल्याशा मिरचीत आहे १०० बॉम्बची पावर; एका मिनिटात जातो खाणाऱ्याचा जीव


सर्वात तिखट मिरची कुठे मिळते?

तुम्हाला जगातीला सर्वात तिखट मिरची कुठे मिळते माहिती आहे का? (Hottest Peppers In The World) ही मिरची कितीही मोठा तीस मार खा आला तरी खाऊ शकणार नाही. कारण या तिखट मिरचीमुळे माणसांचे मृत्यू देखील झाले आहेत.

मिरची खाताच निघते आग

या मिरचीचं नाव ‘ड्रायगन ब्रेथ’ (Dragon's Breath) असं आहे. ही मिरची इतकी तिखट असते की खाणाऱ्याच्या तोंडातून जणू आगच निघते. त्यामुळे या मिरचीला ड्रायगन ब्रेथ असं म्हणतात.

ड्रायगन ब्रेथ नाव का ठेवलं?

या मिरचीचं उत्पादन ब्रिटनमधील Denbighshire आणि Saint Asaph या ठिकाणी केलं जातं. युरोपमधील माईक स्मिथ या शेतकऱ्यानं या तिखट मिरचीचा शोध लावला होता. ही मिरची खाल्ल्यानंतर शेतकऱ्याच्या संपूर्ण अंगात आग झाली होती. जणू त्याचं तोंड आगीनं भाजल्यासारखं झालं होतं. म्हणूनच त्याने या मिरचीचं नाव ‘ड्रायगन ब्रेथ’ असं ठेवलं.

मिरची खावून झाले मृत्यू

ही मिरची तब्बल २.४८ दशलक्ष स्कोव्हिल युनिट्स इतकी तिखट आहे. (Hottest chilli Peppers) सर्वसाधारण भाषेत सांगायचं झालं तर या दोन मीरच्या एकाच वेळी खाल्ल्या तर श्वास गुदमरून माणसाचा मृत्यू देखील होऊ शकतो.

गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

‘ड्रायगन ब्रेथ’ला जगातील सर्वात तिखट मिरची म्हणून गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा (Guinness World Records) पुरस्कार देखील मिळाला आहे. ही मिरची खरेदी करताना त्याच्या पाकिटावर सावधानतेचा इशारा देखील दिला जातो. त्यामुळे जर तुम्हाला तिखट खाण्याची सवय नसेल तर तुम्ही या मिरचीपासून चार हात लांबच राहा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग