अ‍ॅपशहर

Video: एका लाडूसाठी भर लग्नात राडा, नवरा-नवरीमध्ये झाली WWE फाईट

Funny Wedding Video: लग्नातील हा हैराण करणारा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.

Authored byमंदार गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Dec 2022, 4:00 pm
अनेक कुटुंबांमध्ये लग्न करताना जन्म पत्रिकांना विशेष महत्व दिलं जातं. पत्रिकेतील गुण जुळल्याशिवाय आई-वडील लग्नाला मान्यता देत नाहीत. जर मुला-मुलीचे ३६ पैकी ३६ गुण जुळले तर त्यांची जोडी खुद्द देवानेच बनवली आहे असं म्हटलं जातं. पण काही वेळेस या ३६ गुणांमुळे मोठा गोंधळ देखील होतो. आता हाच व्हिडीओ पाहा ना, एका लाडूवरून भर मांडवात नवरदेव आणि नवरीमध्ये हाणामारी झाली. एकाने केलेल्या चुकीची पुनरावृत्ती दुसरा करतोय. लग्नातील हा हैराण करणारा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. OMG! चिमुकल्यानं सिंहाच्या जबड्यात घातला हात, पुढे जंगलाच्या राजानं काय केलं तुम्हीच पाहा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम husband and wife fight due to laddu in wedding ceremony
Video: एका लाडूसाठी भर लग्नात राडा, नवरा-नवरीमध्ये झाली WWE फाईट



एका लाडूसाठी इतकं भांडण

तर त्याचं झालं असं की, लग्न झाल्यानंतर नवरा आणि नवरी एकमेकांना लाडू भरवण्याची प्रथा साजरी केली जात आहे. सर्वप्रथम नवरदेव नवरीला लाडू भरवण्याचा प्रयत्न करतो. पण नवरी काही तो लाडू खात नाही. तिच्या या नखऱ्यांमुळे नवरा भडकतो अन् भर मांडवात तिच्या थोबाडीत मारतो. त्यामुळे मग नवरी सुद्धा भडकते. अन् ती देखील त्याच्या थोबाडीत मारते. अखेर दोघांची जोरदार हाणामारी सुरू होते. महिला पोलीस अधिकाऱ्याचा बोल्ड व्हिडीओ व्हायरल, इंटरनेटवर उडवली एकच खळबळ

मांडवात नेमकं काय घडलं?

३६ पैकी ३६ गुण जुळल्यावर…

हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो नेटकऱ्यांनी पाहिला असून त्यावर विविध प्रकारच्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ३६ पैकी ३६ गुण जुळल्यावर असंच काहीतरी घडलं असं म्हणत काही जण त्या जोडीची फिरकी देखील घेत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटलं? तुम्ही देखील आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया आमच्या सोशल मीडिया कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.

लेखकाबद्दल
मंदार गुरव
"मंदार हा एक कुशल कंटेन्ट रायटर आहे. तो व्हायरल सेक्शनसाठी लिखाण करतो. त्याच्याकडे ७ वर्षांचा अनुभव आहे. व्हायरलसोबतच तो खेळ, मनोरंजन आणि राजकारण या विषयांवरही लिखाण करतो. आपल्या वाचकांना अचूक माहिती देण्यासाठी तो विविध विषयांवर संशोधन करतो. यापूर्वी त्याने प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्येही काम केले आहे. मंदारला छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वाचायला खूप आवडते. सोबतच त्याने विनोदी कथा, रहस्य कथा, विज्ञान कथा, भय कथा यांसारख्या विविध विषयांची पुस्तकं वाचली आहेत. वाचनासोबतच चित्रपट आणि नाटके पाहायला सुद्धा आवडतात. विशेषत: भय आणि विनोद या पठडीत मोडणाऱ्या कलाकृतींमध्ये विशेष रस आहे. तसेच मंदार फावल्या वेळेत कविता लिहिण्याची सुद्धा आवड आहे. मंदार आपल्या वाचकांची आवड आणि रूची समजून त्या अनुशंगाने लिखाण करतो. मंदारच्या लिखाणाची शैली ही फारच साधी आणि सोपी आहे. त्यामुळे त्याचे लिखाण लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातले लोक वाचू शकतात. वाचकांना अचूक माहिती देण्यासाठी मंदार वचनबद्ध आहे. आपल्या सर्जनशील लिखाण शैलीमुळे तो टीममधील एक महत्वाचा सदस्य आहे."... आणखी वाचा

महत्वाचे लेख

ट्रेंडिंग