अ‍ॅपशहर

गुटखा खाणाऱ्यांचं अभिनंदन! तुम्हाला मिळणार हे ७ पुरस्कार, बक्षिस मिळवण्यासाठी भरा हा फॉर्म

गुटख्यांच्या पाकिटावर त्याचे दुष्परिणाम लिहिलेले असतात. परंतु व्यसनी मंडळी कुठे काय ऐकतात. अशा मंडळींना वठणीवर आणण्यासाठी एका IAS अधिकाऱ्यानं अनोखी शक्कल लढवली आहे. (IAS viral tweet) गुटखा खाणाऱ्या लोकांना ते ७ प्रकारचे पुरस्कार देणार आहेत. (7 Award for Gutka king) हे पुरस्कार देऊन गुटखा खाल्ल्याबद्दल त्यांचा गौरव केला जाणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 May 2022, 1:06 pm
तंबाखूजन्य पदार्थ हे शरीरासाठी हानिकारक असतात. या पदार्थांमुळे कर्करोग, हृदयविकार, अस्थमा असे आजार उद्भवू शकतात. तंबाखूजन्य पदार्थांमुळे आयुष्यमान कमी होतं असं वैद्यकिय तज्ज्ञ सांगतात. तरी देखील अनेक मंडळी गुटख्याचं सेवन करतात. या गुटख्यांच्या पाकिटावर देखील त्याचे दुष्परिणाम लिहिलेले असतात. परंतु व्यसनी मंडळी कुठे काय ऐकतात. अशा मंडळींना वठणीवर आणण्यासाठी एका IAS अधिकाऱ्यानं अनोखी शक्कल लढवली आहे. (IAS viral tweet) गुटखा खाणाऱ्या लोकांना ते ७ प्रकारचे पुरस्कार देणार आहेत. (7 Award for Gutka king) हे पुरस्कार देऊन गुटखा खाल्ल्याबद्दल त्यांचा गौरव केला जाणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ias viral tweet if you eat gutka you will get this 7 award
गुटखा खाणाऱ्यांचं अभिनंदन! तुम्हाला मिळणार हे ७ पुरस्कार, बक्षिस मिळवण्यासाठी भरा हा फॉर्म



गुटखा खा आणि पुरस्कार मिळवा

भारतीय प्रशासनिक सेवा अधिकारी (IAS) अवनीश शरण यांनी एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोच्या माध्यमातून ते तंबाखूजन्य पदार्थांविरोधात जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. या फोटोमध्ये गुटखा खाणाऱ्या लोकांना कुठले पुरस्कार दिले जातील याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यांनी जाहीर केलेली ही अनोख्या पुरस्कारांची यादी सध्या सर्वत्र चर्चेत आहे. (आली लहर केला कहर! भर मांडवात नवरा-नवरीनं घेतलं पेटवून, पाहा अजब जोडप्याचं गजब लग्न)

कुठले पुरस्कार दिले जाणार आहेत?

प्रथम पुरस्कार- कर्करोग

द्वितीय पुरस्कार- तोंडाचे आजार

तृतय- लहान तोंड

चतुर्थ- तारुण्यातच म्हातारपण

पंचम- किडणीचे आजार

षष्ठम- खोकला आणि कफ

(‘लाईट गेली म्हणून मुंबई जिंकली’, चिढलेले CSK फॅन्स MI ला करतायेत ट्रोल))

सप्तम- राम नाम सत्य है (मृत्यू)

पुरस्कारासाठी फॉर्म कुठे मिळेल? - पानाची गादी

पुरस्कार सोहळा कुठे होणार आहे? - स्मशानभूमी

मुख्य अतिथी - यमराज

इच्छूकांनी लगेच संपर्क साधावा, प्रत्येक गुटख्यासोबत कमकूवतपणा फ्री मिळेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग