अ‍ॅपशहर

अमेरिकेने घेतली मराठी माणसाची नखं; पाहा काय आहे ‘या’ नखांमध्ये असं खास?

पुण्यातील मराठी माणसाची नखं हवी आहेत अमेरिकेला; नखं पाहून सर्वांनाच बसला धक्का

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Mar 2022, 3:48 pm
महाराष्ट्राचा इतिहास सांगतो की मराठी माणसाने मनात आणलं तर तो अगदी काहीही करू शकतो. अगदी सातासमुद्रापार असलेल्या युरोप-अमेरिकेलाही स्वत:ची नोंद घ्यायला भाग पाडू शकतो. असाच एक मराठी अवलिया सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या व्यक्तीची नखं चक्क अमेरिकेतील म्युझियमध्ये ठेवण्यात आली आहेत. आता प्रश्न असा पडतो की त्याच्या या नखांमध्ये असं होतं तरी काय? का अमेरिकेने मागीतली त्याची नखं?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Shridhar Chillal



वडील करायचे अत्याचार, आईनंच केलं पॉर्नस्टार; ३ कोटी रुपयांत विकलं मुलीचं शरीर
पुण्यात राहणाऱ्या या व्यक्तीचं नाव श्रीधर चिल्लाल असं आहे. या ८६ वर्षांच्या आजोबांनी जगातील सर्वात लांब नखं वाढवण्याचा विक्रम केला होता. त्यांची नखं तब्बल ३१ फुट लांब होती. या अनोख्या नखांसाठी त्यांना ‘गिजिन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ या पुरस्कारानं देखील गौरवण्यात आलं होतं. ही नखं तब्बल ६६ वर्षानंतर त्यांनी कापली. जवळपास ३ मजली इमारती एवढी लांब ही नखं पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. ही नखं अलौकिक आहेत. त्यामुळे जगभरातील लोकांना ती पाहता यावी. यासाठी अमेरिकेतील 'रिप्लेज, बिलिव्ह इट ऑर नॉट' म्युझियमने त्यांच्याकडून मागून घेतली अन् ती आता प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत.

४ हजार किलोंचा हत्ती अडकला दलदलमध्ये; पाहा ‘या’ अजस्त्र प्राण्याला कसं काढलं बाहेर?

चालत्या बसमध्ये शाळेतल्या मुलींची बियर पार्टी; Video पाहून पोलीसही हादरले
का वाढवली इतकी लांब नखं?

श्रीधर आजोबा शाळेत असताना त्यांच्यामुळे एका शिक्षकाचं नख तुटलं होतं. ही घटना आहे १९५२ सालची. त्यावेळी शिक्षक प्रचंड संतापले होते. स्वत:चं नख तुटल्याशिवाय होणाऱ्या वेदना तुला कळणार नाहीत असं त्यांनी भर वर्गात त्यांना सुनावलं होतं. परिणामी एक आव्हान म्हणून त्यांनी आपली नखं वाढवण्यास सुरुवात केली. अन् ही वाढ पुढे ६६ वर्ष सुरुच होती. त्यांनी तब्बल ३१ फुट नखं वाढवली होती. वाढत्या वयामुळे आता ही नखं सांभाळणं त्यांना त्रासदायक वाटत होतं. शिवाय त्यांच्या डाव्या हाताला अपंगत्व देखील आलं होतं. त्यामुळे अखेर त्यांनी या नखांना नेलकटर लावण्याचा निर्णय घेतला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग