अ‍ॅपशहर

या कुत्र्याकडे आहेत सुपाइतके लांब कान; गंमती गंमतीत झाला वर्ल्ड रेकॉर्ड

या कुत्र्याने पृथ्वीवरील सर्वात लांब कान असण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर नोंदवला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने देखीव विशेष पुरस्कार देत या कुत्र्याचं कौतुक केलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Nov 2021, 3:51 pm
आपलं हे जग विचित्र घटनांनी, गोष्टींनी आणि माणसांनी भरलेलं आहे. दररोज कोणी ना कोणी काहीना काही विक्रम हा करत असतो. हल्ली तर माणसांच्या जोडीला प्राणी देखील विक्रम करु लागले आहेत. सध्या असाच एक विक्रमवीर कुत्रा चर्चेत आहे. या कुत्र्याने पृथ्वीवरील सर्वात लांब कान असण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर नोंदवला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने देखीव विशेष पुरस्कार देत या कुत्र्याचं कौतुक केलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Dog with Longest Ear


या तीन वर्षीय कुत्र्याचं नाव लू असं आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या (Guinness World Records) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या कुत्र्याच्या कानाची लांबी १३.३८ इंच आहे. लूच्या कानाची लांबी पृथ्वीवर जिवंत असणाऱ्या कुत्र्यांमध्ये सर्वाधिक आहे. याचमुळे त्याचा वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला आहे. तो ओरेगनमध्ये आपल्या मालकिणीसोबत राहतो. या कुत्र्यावर सध्या जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लूची मालकीण या अनोख्या विक्रमावर म्हणाली, “त्याचे कान मोठे होते त्यामुळेच मला तो खूप आवडला. त्याचे कान पाहूनच मी त्याला माझ्या घरी आणलं. पण कुत्र्यांमध्ये सर्वात मोठे कान लूचे आहे हे मात्र माझ्यासाठी सरप्राईज होतं. लॉकडाउनच्या काळात माझ्याकडे करण्यासारखं काहीच नव्हतं त्यामुळे मी त्याचे कान मोजले अन् गंमत म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला त्याची माहिती दिली. त्याच्या या वेगळेपणामुळे लूचं नाव प्रसिद्ध झालं. लू काळ्या आणि टॅन कलरचा कुत्रा असून त्याचे लांब कान त्याचं सौंदर्य आणखीच वाढवतात.”

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग