अ‍ॅपशहर

हे लोक वाचवणार इम्रान खान यांना? पाकिस्तानी कराटे पाहून जॅकी चॅनलाही येईल चक्कर

"आम्ही इम्रान खान यांना वाचवण्यासाठी तयारी करत आहोत. स्ट्रीट फायटर त्यांना वाचवल्याशिवाय राहणार नाहीत." अशा प्रकारची वक्तव्य तो व्यक्त कॅमेऱ्यासमोर करतो. बरं तो ज्या पद्धतीने बोलतो, त्याचे जे हावभाव आहेत, अन् त्याच्या पाठीमागे व्यायाम करणाऱ्या मंडळींच्या ज्या आक्रमक प्रतिक्रिया आहेत त्या पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Mar 2022, 10:08 am
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तानात सध्या मोठी राजकीय अस्थितरता निर्माण झाली आहे. या प्रस्तावावर लवकरच मतदान होणार असून इम्रान यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री सरकारविरोधात भूमिका घेतील अशी शक्यता आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर एक गंमतीशीर व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. २७ मार्च रोजी एका संघटनेने इम्रान खान यांच्या समर्थनार्थ एक सेल्फ डिफेंस रॅली काढली होती. त्याच संघटनेने आता त्यांच्या व्यायामाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्यायाम करण्याची ही अनोखी पद्धत पाहून तुम्हाला देखील आपलं हसू रोखता येणार नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Pakistan PM Imran Khan


काय आहे या व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की काही लोक रस्त्यावरच व्यायाम करत आहेत. सदरा आणि लेहंगा घालून व्यायाम करणारी ही मंडळी हवेमध्ये पंच आणि किक मारतायेत. ज्या प्रमाणे ज्युडो-कराटेचं प्रशिक्षण घेतलं जातं तसा आवेग या मंडळींचा आहे. याच दरम्यान अचानक एक व्यक्ती उठून उभा राहातो आणि कॅमेऱ्यासमोर येऊन आपल्या संघटनेची माहिती देतो.



आम्ही इम्रान खान यांना वाचवण्यासाठी तयारी करत आहोत. स्ट्रीट फायटर त्यांना वाचवल्याशिवाय राहणार नाहीत. अशा प्रकारची वक्तव्य तो व्यक्त कॅमेऱ्यासमोर करतो. बरं तो ज्या पद्धतीने बोलतो, त्याचे जे हावभाव आहेत, अन् त्याच्या पाठीमागे व्यायाम करणाऱ्या मंडळींच्या ज्या आक्रमक प्रतिक्रिया आहेत त्या पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

भारतीय नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

हा अनोखा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओ पाहून भारतीय तरी कसे शांत बसतील. मग काही भारतीय नेटकऱ्यांनी देखील काही ट्विट्स करून या पाकिस्तानी स्ट्रीट फायटर्सची खिल्ली उडवली आहे.

चक्रमपणा थांबवा रे आता!


मेंदूची पार वाट लागली आहे


तुम्ही तर कमाल आहात


भारतीयांशी पंगा घेऊ नका


ब्रूल लीचे दर्शन घडवले तुम्ही


काय चक्रमपणा लावलाय?


बालपणीचे दिवस आठवले


काय म्हणाले होते इम्रान खान?

इस्लामाबाद येथील परेड ग्राउंडवर इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ (पीटीआय) या पक्षाने आज भव्य सभेचं आयोजन केलं होतं. या सभेसाठी इम्रान यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. या सभेला संबोधित करताना इम्रान खान यांनी म्हटलं की, 'माझ्या मंत्र्यांना आर्थिक आमिष दाखवून खरेदी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पाकिस्तानातील जनता आजही माझ्यासोबत आहे आणि म्हणूनच मला तुमचा अभिमान आहे. हा देश कशासाठी बनवला गेला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. विरोधी पक्षातील लोकांनी माझ्याविरुद्ध कारस्थान रचलं आहे, परंतु तुम्ही त्यांना यशस्वी होऊन देऊ नका,' असं आवाहन इम्रान खान यांनी केलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग