अ‍ॅपशहर

ना विज, ना पाणी, ना बेडरुम; ‘या’ उजाड घरासाठी मोजले ४ कोटी ४६ लाख, पण का?

घर खरेदी केलेल्या व्यक्तीला दुरुस्त करण्यासाठीच लाखो रुपयांचा खर्च करावा लागेल अशा स्थितीत ते आहे. मात्र तरी देखील या उजाड घरासाठी तब्बल १४ कोटी रुपये मोजण्यात आले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jan 2022, 5:19 pm
एक घर खरेदी करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. असं घर जिथे सर्व प्रकारच्या सोयी सुविधा असतील. त्या घरात जातात शांतता मिळेल, कुटुंबातील लोक आनंदी होतील, घराच्या आसपास बाग असेल, अशा घराची स्वप्न प्रत्येक जण पाहात असतो. परंतु याच्या बरोबर उलट गोष्टी असलेलं एक घर कोट्यवधींच्या किंमतीत विकलं गेलं आहे. हे घर अक्षरश: मोडकळीस आलं आहे. घर खरेदी केलेल्या व्यक्तीला दुरुस्त करण्यासाठीच लाखो रुपयांचा खर्च करावा लागेल अशा स्थितीत ते आहे. मात्र तरी देखील या उजाड घरासाठी तब्बल १४ कोटी रुपये मोजण्यात आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम This Old House



हे घर अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को या भागात आहे. शहरापासून दूर असलेलं हे घर मोडकळीस आलं आहे. न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार या घरात एकही बेडरूम नाही, केवळ हॉल आणि किचन या दोनच खोल्या आहेत. शिवाय फ्लोरिंग असं आहे की कधीही मोडून खाली पडेल. बाथरुममध्ये पाण्याची धड व्यवस्था नाही. शिवाय वायरिंग देखील १९ व्या शतकातील आहे. जवळपास १०० वर्ष हे घर बंद होतं. त्यामुळे विजेचं कनेक्शन देखील उंदरांनी कुरतडून टाकलं आहे.


हे घर Noe Valley मध्ये आहे. या भागातील बहुतांशी घरं जुनीचं आहेत. परंतु हे सर्वात जास्त वाईट स्थितीत असलेलं घर आहे. या घरात कुठल्या प्रकारच्या सोयी सुविधा नाहीत. उलट खरेदी करणाऱ्या व्यक्तीला रिपेरिंगसाठीच लाखो रुपये खर्च करावे लागतील. लक्षवेधी बाब म्हणजे तरी देखील ४.४६ कोटी रुपयांमध्ये हे घर विकलं गेलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीला जुन्या वस्तूंची आवड आहे. त्यामुळे या घरात त्याला नक्कीच काहीतरी अमुल्य अशा गोष्टी सापडतील असं म्हटलं जात आहे. परंतु या घराची स्थिती पाहात ते घरं अजून किती दिवस उभं राहिल अशी शंका व्यक्त केली जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग