अ‍ॅपशहर

‘गायीनं शिंग मारलं तर काय करायचं?’ 'काऊ हग डे'वर नेटकरी देतायेत अशा प्रतिक्रिया

Cow Hug day: व्हॅलेंटाईन डेला गायीला मिठी मारायचं आवाहन केलं तर गोंधळ तर होणारच. अर्थातच या व्हायरल होणाऱ्या प्रत्रकावरही देशभरातील नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.

Authored byमंदार गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Feb 2023, 5:14 pm

१४ फेब्रुवारी हा दिवस जगभरात व्हॅलेंटाइन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करतात. या दिवशी लोक आपल्या प्रिय व्यक्तीला भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त करतात. परंतु व्हॅलेंटाइन डे बाबत भारतात मात्र मिश्र प्रतिक्रिया दिल्या जातात. काही विरोधकांच्या मते तर व्हॅलेंटाइन डे हे पाश्चात्य संस्कृतीचं भारतीय संस्कृतीवर होणारं आक्रमण आहे. त्यामुळे ते व्हॅलेंटाइन डेला विरोध करतात. याच पार्श्वभूमीवर पशु कल्याण मंडळानं एक मार्गदर्शक पत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये १४ फेब्रुवारीला 'काऊ हग डे' साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आता ज्या दिवशी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एकमेकांना मिठ्या मारतात त्या दिवशी गायीला मिठी मारायचं आवाहन केलं तर गोंधळ तर होणारच. अर्थातच या व्हायरल होणाऱ्या प्रत्रकावरही देशभरातील नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. ‘गायीनं शिंग मारलं तर’ असा प्रश्न विचारत कोणी विरोध करतंय. तर कोणी ‘गायीला मिठी मारण्यात हरकत काय?’ असा प्रश्न विचारत पाठिंबा देतंय. (फोटो सौजन्य - pixabay.com, @Awhadspeaks - Twitter) ‘लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा लपला शेजाऱ्यांच्या घरात’, या १५ बातम्या वाचून आवरणार नाही हसू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम twitter users reply on 14 feb cow hug day
‘गायीनं शिंग मारलं तर काय करायचं?’ 'काऊ हग डे'वर नेटकरी देतायेत अशा प्रतिक्रिया


तुम्ही गाईचं दूध पिता का?

सुंदर कल्पना आहे!

हॉस्पिटलचा खर्च कोण करणार?

गायीनं शिंग मारलं तर?

हे आवाहन आहे आदेश नाही

गायीला मिठी मारा!

प्राण्यांना मिठी मारण्यात गैर ते काय?

​पशु कल्याण मंडळ काय म्हणालं?​

पाश्चिमात्य संस्कृतीमुळं वैदिक परंपरा मागं पडल्या आहेत. पाश्चिमात्य संस्कृतीमुळं आपल्याला सांस्कृतिक आणि समृद्ध वारशाचा विसर पडल्याचं पशु कल्याण मंडळानं म्हटलं आहे. गायीपासून होणाऱ्या लाभांचा विचार करता गायीला मिठी मारल्यास भावनिक समृद्धता मिळू शकते. यामुळं सामुदायिक, वैयक्तिक आनदांत वाढ होईल. त्यामुळं गायप्रेमी नागरिकांनी १४ फेब्रुवारीच्या दिवशी गायीला मिठी मारावी आणि जीवन आनंदी बनवाव, असं आवाहन पशु कल्याण मंडळानं केलं आहे. (फोटो सौजन्य - pixabay.com) Memes: ‘तो तर गुटखा खातो’, ‘चॉकलेट डे’वर सिंगल लोकांनी दिल्या अशा रिअ‍ॅक्शन

लेखकाबद्दल
मंदार गुरव
"मंदार हा एक कुशल कंटेन्ट रायटर आहे. तो व्हायरल सेक्शनसाठी लिखाण करतो. त्याच्याकडे ७ वर्षांचा अनुभव आहे. व्हायरलसोबतच तो खेळ, मनोरंजन आणि राजकारण या विषयांवरही लिखाण करतो. आपल्या वाचकांना अचूक माहिती देण्यासाठी तो विविध विषयांवर संशोधन करतो. यापूर्वी त्याने प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्येही काम केले आहे. मंदारला छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वाचायला खूप आवडते. सोबतच त्याने विनोदी कथा, रहस्य कथा, विज्ञान कथा, भय कथा यांसारख्या विविध विषयांची पुस्तकं वाचली आहेत. वाचनासोबतच चित्रपट आणि नाटके पाहायला सुद्धा आवडतात. विशेषत: भय आणि विनोद या पठडीत मोडणाऱ्या कलाकृतींमध्ये विशेष रस आहे. तसेच मंदार फावल्या वेळेत कविता लिहिण्याची सुद्धा आवड आहे. मंदार आपल्या वाचकांची आवड आणि रूची समजून त्या अनुशंगाने लिखाण करतो. मंदारच्या लिखाणाची शैली ही फारच साधी आणि सोपी आहे. त्यामुळे त्याचे लिखाण लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातले लोक वाचू शकतात. वाचकांना अचूक माहिती देण्यासाठी मंदार वचनबद्ध आहे. आपल्या सर्जनशील लिखाण शैलीमुळे तो टीममधील एक महत्वाचा सदस्य आहे."... आणखी वाचा

महत्वाचे लेख

ट्रेंडिंग