अ‍ॅपशहर

मोठं झाल्यावर काय करणार? लहान मुलाची स्वप्न पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क

या मुलाच्या उत्तरावर हसावं की रडावं हेच कळत नाही. या लहान मुलाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jan 2022, 11:24 am
मोठं झाल्यावर कोण होणार? असा प्रश्न विचारताच लहान मुलं साधारणपणे डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक, शिक्षक, संशोधक अशी उत्तर देतात. थोडक्यात काय तर मोठं झाल्यावर काही तरी भव्यदिव्य करावं अशी त्यांची स्वप्न असतात. परंतु सोशल मीडियावर सध्या एक अनोखा मुलगा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या मुलानं मोठं झाल्यावर काय करणार? या प्रश्नावर असं उत्तर दिलं की जे ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. या मुलाच्या उत्तरावर हसावं की रडावं हेच कळत नाही. या लहान मुलाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Child funny answer


या व्हिडओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका लहान मुलाला मोठं झाल्यावर तू कोण होणार? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर त्याने आश्चर्यचकित करणारं उत्तर दिलं. मुलगा सांगतो, “लिहिता येत नाही, वाचता येत नाही, मग आम्ही कोण बनणार? हो, पण मोठं होऊ तेव्हा आम्ही काम करू, आमचं घर उभारू, खाऊ-पिऊ आणि बायकोला आणू आणि काय करणार, दोन-तीन मुलं होतील. यापेक्षा जास्त काय करणार.”

View this post on Instagram A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)

मुलाचं हे उत्तर ऐकताच प्रश्न विचारणारा अँकर देखील थक्क झाला. लग्नानंतर दोन-तीन मुलं? असा आणखी एक प्रश्न तो त्या मुलाला विचारला. तेव्हा मात्र मुलगा संतापतो आणि म्हणतो, “मुलं जन्माला नाही घालणार तर काय, आम्ही मुलांशिवाय राहणार का?” हे उत्तर ऐकून अखेर अँकरची देखील बोलती बंद होते. हा चकित करणारा व्हिडीओ bhutni_ke_memes नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग