अ‍ॅपशहर

असं सौंदर्य काय कामाचं? सुंदर दिसण्याच्या नादात महिलेचा जिंवतपणीच झाला मृतदेह

काही वेळेस हे सौंदर्याचं वेड त्यांच्या अंगाशी देखील येतं. नको त्या सर्जऱ्या करुन संपूर्ण शरीर विदृप होतं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Nov 2021, 10:39 am
सुंदर दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटतं. त्यामुळे महिला ब्युटिपार्लर, स्पा, सेलून अशा ठिकाणी हजारो रुपये खर्च करतात. हल्लीच्या काळात तर अनेक महिला प्लॅस्टिक, कॉस्मेटिक सर्जरीचाही आधार घेतात. कारण कुठल्याही परिस्थितीत त्यांना सुंदर दिसायचं असतं. परंतु काही वेळेस हे सौंदर्याचं वेड त्यांच्या अंगाशी देखील येतं. नको त्या सर्जऱ्या करुन संपूर्ण शरीर विदृप होतं. असाच काहीसा अनुभव ही महिला घेत आहे. सुंदर दिसण्याच्या नादात या महिलेची अवस्था जणू मृतदेहासारखी झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Cosmetic Surgery


टर्कीमध्ये राहणाऱ्या या महिलेचं नाव सबीना अब्बास असं आहे. ३२ वर्षीय सबीनाने आपलं सौंदर्य आणखी वाढवण्यासाठी एक ब्युटी सर्जरी केली होती. मात्र यामुळे तिच्या शरीराची पार वाट लागली. तिचे डोळे आणि तोंड आता बंद होत नाही. तिला बोलताही येत नाही. गेल्या चार वर्षांपासून अशाच अवस्थेत ती रुग्णालयात पडली आहे. सर्जरीमुळे ती व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये गेली. व्हेजिटेटिव्ह स्टेट हे कोमासारखंच असतं. पण यामध्ये व्यक्ती शुद्धीवर असते. केवळ आसपास काय चाललं आहे हे तिला कळत नाही. त्या व्यक्तीचं शरीर म्हणजे जणू एक जिवंत मृतदेहच असतो.


मिरर यूकेने दिलेल्या वृत्तानुसार सबीनाला आणखी सुंदर दिसायचं होतं. त्यासाठी तिने कॉस्मेटिक सर्जरीचा आधार घेतला. तिने नाकाचा आकार आणि शरीरातील फॅट कमी करून घेतलं. २०१७ साली एका खासगी रुग्णालयात तिने ही कॉस्मेटिक सर्जरी केली होती. मात्र ही सर्जरी करत असताना चार मिनिटांसाठी तिचं हृदय बंद पडलं होतं. अन् याच दरम्यान ती व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये गेली. सबीनाला दोन मुलं आहेत. गेल्या चार वर्षांपासून ती रुग्णालयात असल्यामुळे त्यांचं आयुष्य विस्कळीत झालं आहे. या प्रकरणी सबीनाच्या पतीने रुग्णालयाला जबाबदार ठरवलं. त्याने त्यांच्याविरोधात तक्रारही केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग